Wednesday, August 17, 2022

पारोळा येथे चोरांचा धुमाकुळ सुरुच, निवृत शिक्षकाकडे दुसर्यांदा चोरी

- Advertisement -

पारोळा | प्रतिनिधी

- Advertisement -

पारोळा शहरात चोरांनी धुमाकुळ घातला असुन  एकाच रात्रीत तीन  घरात चोर्या झाल्याने शहरात भिती चे वातावरण आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि शहरातील शिव कालुनी,साने गुरूजी काॅलनी,व शहराच्या मध्यवरती असलेल्या जुन्या अभिजित स्टुडिओ शेजारी येथे एकाच रात्री या तिन्ही ठिकाणी चोर्या झाल्या असल्याने शहरातील नागरिक भयभित झाले आहेत एकाच रात्री तिन ठिकाणी चोरी करुन  या चोरांनी पोलिसा पुढे आवाहन उभे केले आहे.
चोरांनी शिव काॅलुनी येथुन दोन लाखाच्या ऐवजा वर डल्ला मारला असुन शहरातील सेवा निवृत शिकक्षाकडे त्यांनी  २१,५०० रुपयावर डल्ला मारला आहे,यात  रोकड,चांदी ची मुर्ती,अॅनराईड मोबाईल,सोलापुरी चादरी, काही नविन कपडे चोरुन नेल्याची फिर्याद येथिल सेवा निवृत शिक्षक जि,जे,भावसार सर यांनी दिली आहे,भावसार सर यांच्या कडे ही दुसर्यांदा चोरी झाली असल्याची माहिती दिपक भावसार यांनी दिली या आगोदर दहा वर्षा पुर्वी याच घरातुन चोरट्यानी   सुमारे २५ लाख रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला होता, अशी माहिती जि,जे,भावसार यांनी दिली या तिन्ही गुन्ह्याची पारोळा पोलिस स्टेशन ला करण्यात आली असुन जळगांव येथुन श्वान पथक व ठसे तज्ञ यांच्या मद्दतीने चोरट्यांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या