पारोळा:- शहरात सालाबाद प्रमाणे या वर्षीही गुरूनानकदेव व सिंधी समाजाचे महान संत बाबा ज्युडियाराम यांची जयंती कोरोनाच्या पृष्ठभूमीवर पद्दतीने साजरी करण्यात आली,
याबाबत अधिक असे कि ,३० सोमवार रोजी पुर्णिमेच्या दिवशी गुरूनानकदेव व बाबा ज्युडिराम यांची जयंती पारोळा झुलेलाल सिंधी पंचायतच्यावतीने साध्या पध्दत्तीने साजरी करण्यात आली, सर्व प्रथम सकाळी मंदिरात बाबा च्या मृर्तीला पंचामृत स्नान करून कार्तिक मास निम्मित्त सुरू असलेल्या पोथीची सांगता करण्यात आली,व नंतर बाबा ची महाआरती करण्यात आली,याप्रसंगी समाजातील क्वचितच नागरिकांना मंदिरात दक्षता घेऊन प्रवेश देण्यात येत होता,मंदिराच्या बाहेरच एका भक्ताची नियुक्ती करून प्रवेश द्वारा जवळच प्रथम संपुर्ण सॅनिटायझींग करण्यात येत होते व नंतर फक्त माॅस्क असलेल्या भक्तानांच मंदिरात प्रवेश दिला जात होता,यातही प्रथम मध्ये गेलेले जो पर्यंत बाहेर येत नाही तो पर्यंत बाकीच्याना बाहेरच थांबण्याच्या सुचना करण्यात येत होत्या यामुळे स्वतासह इतरांची ही काळजी घेतली जात होती यात सर्वानी सहकार्य केले, यामुळे सर्व कार्यक्रम विधीवत व सोशल डिस्टन्टं पाळत पार पडले,याप्रसंगी समाजाचे मुखी सुरेश हिंदुजा,समाजध्यक्ष अशोककुमार लालवाणी,उपाध्यक्ष शंकर हिंदुजा, यांच्या देखरेखी खाली सर्व कार्यक्रम पार पडले, तसेच समाजाची पंच कमेटी ची निवड ही पाडली यात अध्यक्षपदी शंकर हिंदुजा,उपाध्यक्ष मनोहरलाल हिंदुजा,खजिनदार पदी किशोर नंदवानी,व जितेंद्र हिंदुजा यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी समाजातील खेमचंद हिंदुजा,बालचंद नंदवानी,राजकुमार नागदेव, महेश हिंदुजा,कमल लालवाणी,प्रेमचंद मेलवाणी,गोरधन हिंदुजा,धर्मेंद्र हिंदुजा,विक्रम लालवाणी,विजय मंगलानी,नंदलाल मेलवाणी,तसेच समाजा तील नवयुवक यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकामी सहकार्य केले,याप्रसंगी समाजातील वरिष्ठ मंडळीना मंदिरात न येण्याची विनंती करून घरीच राहाण्याचे सांगण्यात आले तर त्यांच्या साठी मोबाईल द्वारे घरूनच कार्यक्रम पाहाण्याची सोय करण्यात आली होती,