पारोळा -प्रतिनिधी
शहरातील राजीवगांधी नगर येथील रहिवाशी असलेल्या व बालाजी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नऊ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा धरणगांव रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या खदाणीत पोहतांना बुडुन मृत्यु झाल्याची घटना दिनांक २२ रोजी दुपारच्या सुमारास घडली.
श्री बालाजी विद्याप्रभोधिनी शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी उमेश दीपक महाले (वय 9) हा शाळा सुटल्या नंतर घरी आल्यावर खेळण्यास जातो असे सांगून शहरातील धरणगांव रस्त्यालगत झपाट भवानी मंदीराजवळील पाण्याच्या खदाणीत तो आणि त्याचा मित्र पोहण्यास गेले.परंतु खादाणीतील पाण्याचा अंदाज न आल्याने या डोहातील पाणी हे आठ फुट खोल व गाळमिश्रीत असल्याने त्यातल्या त्यात उमेश यास पोहता येत नसल्याने अचानक तोल गेल्याने तो पाण्यात पडाला मित्राने आरडाओरड करुन सदर घटनेची माहीती परिसरातील नागरिकांना दिली . यावेळी गौतम जावळे भगवान वानखेडे, मोहम्मद , किरण वानखेडे, आदिनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात उडया मारल्या परंतु पाणी गाळमिश्रीत असल्याने त्या विद्यार्थ्यास बाहेर काढण्यात मोठी कसरत करावी लागली . गाळ मिश्रीतपाणी असल्या मुळे उमेशच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यास उपचारासाठी ताबडतोब कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी तपासुन मृत घोषित केले .
…..महाले परिवारावर शोककळा ….
उमेशची दुख:द वार्ता कळताच आईने व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.
अचानक पोटचा गोळा निघुन गेल्याने आईने कुटीर रुग्णालयातच हंबरडा फोडला. उमेश हा तीसरी इयत्तेत होता . हुशार व मनमिळावू स्वभावाचा असल्याने शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणून उमेश महाले परिचित होता .
यावेळी घटनास्थळी बालाजी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत पाटील व शिक्षकांनी धाव घेत कुटुंबाचे सात्वन केले.
उमेश महाले याचे वडील हातमजुरी करतात.त्याचा मोठा भाऊ रोहित पाचवीला आहे तर उमेश तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
याबाबत पारोळा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळह्ळ व्यक्त होत आहे .