पारोळा (प्रतिनिधी) : येथील तहसिल कार्यालयात एरंडोल उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी विविध प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक महत्वपूर्ण विषयांना न्याय देत सर्व यंत्रणेस सूचना करत कोव्हीड१९ केयर सेंटर बाबत महत्वपूर्ण पाऊल उचलले.
पारोळा तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीच्या वेळी प्रांत विनय गोसावी, पारोळा तहसीलदार अनिल गवांदे,पारोळा नगरपालिका मुख्याधिकारी डॉ,विजयकुमार मुंडे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रांजली पाटील,तसेज नायब तहसीलदार पंकज पाटील, हे उपस्थित होते.
यावेळी डॉ प्रांजली पाटील यांनी पारोळा तालुका स्तरीय कोव्हीड१९ केयर सेंटर बाबत प्रशासनाला दिलेले पत्र, साहित्याची मागणी जागांचे पर्याय बाबत माहिती दिली यात सप्तर्षिमंगल कार्यालय ,बालाजी माध्यमिक विद्यालय,पारोळा येथील शासकीय आयटीआय,किसान महाविद्यालय,एन.ई.एस बाईज व एन, ई, एस,गर्ल्स.हायस्कूल या जागाबाबत चर्चा होऊन यातील पारोळा येथील शासकीय आयटीआय चा परिसर अंतिम करण्यात आला यावेळी सदर जागेवर सर्व उपस्थित अधिकारी वर्गाने भेट देवून तेथील स्वच्छता,उपाय योजना,अडचणी , रुग्णांना भोजन व्यवस्था,पाण्याची व्यवस्था तसेच लाईट या बाबत सूचना देण्यात आल्या यावेळी प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास या परिसरातील सर्व दुरुस्ती बाबत आदेश देवून परिसराची पाहणी केली.तसेच आरोग्य विभागास लागणाऱ्या साहित्या बाबत लोकसहभागातून मदतीचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कर्मचारी वर्गास अडचणी
यावेळी तहसील कार्यालयातील कर्तव्यावर असणारे पण बाहेर गावी राहणारे कर्मचारी वर्गास धुळे पोलीसा कडून त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रांत अधिकारी यानी त्यांना विशेष पासेस करून देत अधिकारी वर्गाशी चर्चा केली .
पारोळा येथील स्वस्त धान्य दुकानात भेट
पारोळा येथील स्वस्त धान्य दुकानात नागरीकांना वेळेवर स्वस्त धान्य मिळत आहे कि नाही याची माहिती घेण्यासाठी प्रांत विनय गोसावी यांनी स्वता पारोळा शहरतील १३ दुकानाची तपासणी करून योग्य त्या सूचना केल्या.