पारोळा— प्रतिनिधी
पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मा, आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा तालुक्याती शिवसेनेच्या व युवासेनेच्या पदाधिकार्याचीं बैठक घेण्यात आली, बैठकीत मा, आमदार चिमणराव पाटील यांनी मागॅदशॅन केले, मा, आमदार चिमणराव पाटील म्हणाले की युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जिल्हा दौयाॅ वर दि, १८ रोजी येत आहेत, जनआशिवाॅद यात्रा निमित्ताने राज्य भर दौरा होत असून आपल्या पारोळा शहरात दि, १८रोजी सांयकाळी जाहीर सभेचे आयोजन केले, असल्याने महत्त्वाचे नियोजन करावे लागणार आहे, तरी सवॅ कायॅकत्यांनी सजग होउन कामाला लागावे असा सल्ला त्यांनी दिला, या वेळी बाजार समिती चे अध्यक्ष व युवासेना चे अमोल पाटील,ता, प्रमुख प्रा, आर, बी, पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, उपसभापती मधुकर पाटील, इंधवे सरपंच जितेंद्र पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष डॉ, राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भिकन महाजन, प, स, सदस्य भिडू जाधव मा, शहर प्रमुख अण्णा चौध
री, राजेंद्र कासार, भुषण भोई, समाधान पाटील, यांच्या सह अनेक कायॅकते उपस्थित होते,
