Saturday, December 3, 2022

पारोळा येथे आडत दुकानातून पावणेदोन लाख लंपास ; चोरटे सीसीटिव्हीत कैद

- Advertisement -

पारोळा (प्रतिनिधी) : कृषी उत्पन बाजार  समितीच्या आवारातील आडत दुकानातुन पावणेदोन लाख रूपये रोक रक्कम लंपास झाल्याने व्यापार्यान मध्ये घबराटीचे वातवरण निर्माण झाले आहे,याबाबत अधिक माहिती अशी कि पारोळा कृषी उत्पन बाजार समितीच्या आवारात मनोज मानमल लुणावत यांचे आडत दुकान असुन ते नेहमी प्रमाणे सकाळी दुकानात आले तसेच घरून येतांना त्यांनी शेत माल खरेदी साठी १लाख७५हजार,रूपये रोक आणले होते, ते त्यांनी आपल्या दुकानात ठेवले होते.

- Advertisement -

एका शेतकर्याचा माल पाहण्यासाठी ते दुकानाच्या बाहेर गेले असता माल पाहुन परतल्या वर त्यांच्या लक्षात आले कि आपण सोबत आणलेली रोक रक्कमे ची पिशवी जी लाल रंगाची होती ती गायब झाली असल्याने त्यांनी ताबडतोब शोधाशोध सुरू केली परंतु पिशवी कुठे ही दिसुन आली नाही तर सिसिटिव्ही फुटेज पाहीले असता पांढर्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला व्याक्ती सिसिटिव्ह फुटेज मध्ये दिसुन येत होता, यांनेच ही रक्कम लाबवल्याचे दुकान मालक लुणावत यांच्या कडुन सांगण्यात आले या प्रकारामुळे व्यापार्यां मध्ये घबराटीचे चित्र दिसत होते, तरी सर्व व्यापार्यांनी सावधगीरी बाळगुन व्याहार करावेत,पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत,

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या