पारोळा-
स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली साठी बोहरा सेंट्रल स्कूल च्या प्रांगणात ही सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार ए .टी .पाटील यांनी राजकारणात लोकांच्या हृदयात आपुलकीचे स्थान मिळविणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व अटल बिहारी यांचे होते. संसदेची गणिमा टिकून ठेवणारे हजर जबाबी व प्रतिकुल परिस्तिथीत समाजकारण आणि राजकारण त्यांनी केले होते. त्यांचा आचार विचारांचे पालन या पिढीने केले. तर त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे भावना या वेळी खासदार ए .टी. पाटील यांनी व्यक्त केल्यात.
अटलजी सारखा नेता होणे नाही–आमदार डॉ सतीश पाटील .
या वेळी आमदार डॉ सतीश पाटील म्हणाले की देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजी हे राजधर्म पाळणारे ,देशाला विकासाची दिशा देणारे सर्वमान्य नेते ते होते .त्यांच्या अंगी मोठेपणा होता .त्यांचा सारखा नेते होणे आता शक्य नाही. त्यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाल्याच्या भावना आमदार डॉ सतीश पाटील यांनी बोलून दाखविली .
लोकशाही जिवंत ठेवणारा नेता -माजी खासदार अँड वसंतराव मोरे .
या वेळी माजी खासदार अँड वसंतराव मोरे म्हणाले की लोकशाही वर निष्ठा ठेवणारे सामान्य जनतेला न्याय देणारे सर्वांना हवेहवेसे वाटणारे आणि देशाला दिशा देणारे असे सर्वमान्य नेतृत्व अटलजी यांचे होते .अशा भावना या प्रसंगी माजी खा अँड वसंतराव मोरे यांनी व्यक्त केल्यात.
अटलजी दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होत- माजी आमदार चिमणराव पाटील
अटलजी यांच्या नेतृत्वा मुळे पंतप्रधान पदाची उंची वाढली होती. चारित्र्य संपन्न असे व्यक्तिमत्त्व त्यांचे होते .अलौकिक बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्त्व अटलजी यांचे होते. एक सुवर्णपान आणि सुवर्ण युगाचा दुर्मिळ व्यक्तिमत्त्व चाअस्त झाल्याची भावना माजी आमदार चिमणराव पाटील यांनी बोलून दाखविली.
अजातशत्रू असलेले व्यक्तिमत्त्व-नगराध्यक्ष-करण पवार
अटलजी चे चारित्र्यवान प्रतिभावंत देशाचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व त्यांचे होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व त्यांचे होते .त्यांच्या जाण्याने देशाची मोठी भरून न निघणारी हानी झाल्याचे नगराध्यक्ष करण पाटील यांनी भावना या शोक सभेत व्यक्त केल्या .
या वेळी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष पिरन अनुष्ठान, दत्तात्रय महाजन, डॉ शांताराम पाटील, बापू नावरकर, डॉ. जे. के .पाटील , मिलींद मिसर. उपप्राचार्य व्ही. एन. कोळी , अनिल पाठक, वामन चौधरी, आदींनी भावना व्यक्त केल्यात
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा माजी उपनगराध्यक्ष प्रविण दाणेज , नगरसेवक रोहन मोरे नगरसेविका रेखा चौधरी, सुनंदा वाणी वर्षा पाटील , सुरेखा बडगुजर, , प्रकाश महाजन, , जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील , केशव क्षत्रिय, श्रीकांत शिंपी, अँड अतुल मोरे , मधुकर पाटील, भगवान मिस्त्री, विजय पाटील, यांचा सह सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते .प्रस्तवना सुरेंद्र बोहरा, यांनी केले.