पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथिल बाजार पेठेतील भर बाजारात असलेले बाॅम्बे बुट हाॅऊस येथे चोरी झाली, याबाबत अधिक माहिती अशी कि शहरातील बाजार पेठेतील बाॅम्बे बुट हाॅऊस येथे दि,३१ मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी दुकानाचे कुलुप तोडुन शटर वर करुन दुकानात प्रवेश करित ड्रावर मधील १०,४०० दहा हजार चार शे रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला याबाबत दुकानाचे मालक अशोककुमार लालवाणी यांनी माहिती देत सांगितले कि आज पर्यंत या दुकानात पंधरा ते विस वेळेस चोरी झाली असुन चोरीचे सत्र सुरुच आहे,
दोन ते तीन वेळेस गुन्ह्याची नोंद करुन देखील चोरटे सापडत नाहीत वेळो वेळी या दुकानासह बाजारपेठेत चोर चोरी करुन पोलिसां पुढे आवाहन उभे करित आहेत परंतु आज पर्यंत या गुन्ह्यातील चोर सापडत नाहीत ही मोठी आशर्याची बाब आहे,अज्ञात चोरटा हा शहरातीलच भुरटा चोर असल्याची ही बाजार पेठेत चर्चा आहे,तरी ही हा चोर पोलिसांना सापडत नाही, म्हणुन शहरातील व्यापार्यान मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे,एकतर लाॅकडाऊन व दुसरी कडे या वाढत्या चोर्या यामुळे शहरातील व्यापार्यांनी
पारोळा पोलिसा बद्दल नाराजी व्यक्त केली,तसेच बाजारपेठेत दिवसें दिवस चोर्यांचे प्रमाण वाढले असुन पोलिसाचा धाक संपला आहे,असे मत अनेकांनी व्यक्त केले,