पारोळा (प्रतिनिधी) : सिंधी समाजाचे महान संत बाबा ज्युडियाराम साहेब यांचा वार्षीक उत्सव यंदा ही कोव्हीड १९ कोरोना च्या पार्श्वभुमिमुळे रद्द करण्यात आला आहे. या बाबत अधिक असे कि सिंधी समाजाचे महान संत बाबा ज्युडियाराम साहेब यांचा वार्षीक उत्सव हा दर वर्षी १३ ते १५ एप्रिल दरम्यान पारोळा येथिल ओत्तार गल्लीत भव्य अश्या बाबा ज्युडियाराम मंदिरात दर वर्षी जन्मोउत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येतो परंतु मागील वर्षा पासुन कोव्हीड १९ कोरोना मुळे हा वार्षीक उत्सव सलग दुसर्या वर्षीही रद्द करण्यात आला आहे.
कोरोना मुळे मागील वर्षी ही हा उत्सव रद्द करण्यात आला होता. या उत्सहा दरम्यान राज्य सह देशातील विविध भागातुन मंदिरात दर्शनासाठी तसेच उत्सहासाठी येत असतात, परंतु मागील वर्षा पासुन या उत्साहा वर कोरोना चे सावट आहे. या वर्षी मोठ्या उत्सहात हा वार्षीक उत्सव साजरा करण्याचा मानस पारोळा सिंधी पंचायत कडुन करण्यात आला होता परंतु या वर्षी ही कोव्हीड १९ कोरोना ची परिस्थिती पाहुन तसेच राज्य सरकार कडुन कडक निर्बंधा च्या पार्श्वभुमिमुळे हा उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती पारोळा येथिल जय झुलेलाल सिंधी पंचायत चे वरिष्ठ मुखी सुरेश हिंदुजा यांनी दिली असुन बाबा च्या भक्तानी आप आपल्या घरी राहुन मनाने व श्रध्देने बाबा ना प्रर्थना करावी कि जगातील ही महामारी कोरोना लवकरात लवकर समांप्त करावी व पुढील वर्षी हा वार्षीक उत्सवआपण मोठ्या उत्सहात साजरा करू,तसेच कोणीही बाहेरून पारोळा येथिल मंदिरात येऊ नये कारण मंदिर कोरोना मुळे बंद राहाणार असुन या वर्षी ही मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे तरी भक्तानी पारोळा येथे येऊ नये असे आवाहन पारोळा सिंधी पंचायत च्या वतीने करण्यात आले आहे,