पारोळा येथील पहिला कोरोना रुग्णांची घर वापसी

0

पारोळा । प्रतिनिधी
पारोळा शहरातील डी डी नगर भागातील ३८ वर्षीय पहिला कोरोना बाधित रुग्णाने *कोरोनाला हरवूण व बरे होऊन आज त्या रुग्णांने घर वापसी केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे . दिनांक २९ रोजी ५ वाजेच्या सुमारास त्या रुग्णांची तपासणी करुन कोणतेही लक्षण नसल्या मुळे सदर रुग्णास घरी सोडण्यात आले . यावेळी पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार प्रांत अधिकारी विनय गोसावी , तहसीलदार अनिल गावंदे, पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ, विजय मुंडे ,
पारोळा कुटीर रूग्णालयाचे डॉ,योगेश सांळूखे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रांजली पाटील, डॉ गिरीश जोशी, डॉ महाजन यांच्या सह सर्व डॉक्टर, नर्स, उपस्थितीत होते कोरोना तुन बरे झालेल्या व्यक्तिने व त्यांच्या घरच्यांनी सर्वांचे आभार मानले

Leave A Reply

Your email address will not be published.