पारोळा (प्रतिनिधी) : शहरातील ओतारगल्ली येथील ५७ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह निघाला.या बाधीत रुग्णाच्या संपर्कात एकूण ९ जण आले.या सर्वांना कासोदा रोड वरील आय.टी.आय कॉलेज या कोविड सेंटर मध्ये इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार अनिल गवांदे यांनी दिली.
ओतार गल्ली येथील ५७ वर्षीय इसम या बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता . ज्या दुकानावर हा बाधीत रुग्ण कामाला होता त्या दुकानाचा मालक ,एक कामगार व इतर ९ जणांच्या संपर्कात असल्याने त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले होते हे सर्व जण पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील काही जण ,त्यांचे नातेवाईक ,असे एकूण ३५ जण इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आदर्श नगर,ओतारगल्ली, गढरीगल्ली, विश्राम गृह, प्रतिबांधत्मक क्षेत्र घोषित
शहरातील आदर्श नगर , ओतार गल्ली , गढरी गल्ली , चा संपुर्ण भाग हा प्रतिबांधत्मक भाग घोषित केला. यावेळी तहसिलदार अनिल गवांदे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साळुंखे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रांजली पाटील ,मुख्याधिकारी विजय मुंडे ,पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे , शहर तलाठी निशिकांत पाटील , गौरव लांजेवार , आदी जण तातडीने या क्षेत्रात पोहचले.
३५ जणांना सप्तर्षी मध्ये क्लो
दि ३ रोजी १३ जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील ३५ जणांना इंस्टिट्युशनल क्वॉरंटाईन करण्यात आले आहे .