पारोळा बस स्थानकातून विद्यार्थ्यांच्या खिशातून १२ हजार रुपये लांबवले

0

दोन संशयित महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील देवगाव येथील विद्यार्थी समाधान आबा मिस्त्री हा आज रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याचे वडील आबा भाऊराव मिस्त्री व त्यांच्या पत्नी यांना बस स्टैंड वर सोडण्यासाठी गेला असता त्याच्या खिशातील अकरा हजार आठशे रुपये रोख मुक्ताईनगर मालेगाव या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत खिशातील रोख रक्कम काढून घेतली.  तो उतरत असताना त्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने हार्डवर्क करून संशयित दोन महिला नंदा ज्ञानदेव राठोड छकुली राठोड राहणार देवी तांडा तालुका चाळीसगाव अशांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते त्यांचे बनावट नाव सांगत असून त्यांचे खरे नाव काढण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असून याबाबत समाधान आबा मिस्त्री एकोणवीस नंदा शिक्षण राहणार देव यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत असून याबाबत या महिलांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांनी कसून तपासणी करण्याची मागणी सर्वत्र होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.