पारोळा नगराध्यक्षांची विवाह समारंभात अनोखी भेट

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले भगवान चौधरी हे सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. कालांतराने त्यांचे दुर्दैवी दुःखद निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने चौधरी कुटुंबावर काळाचा घात झाला. वडिलांबरोबर काही अंतराने आईचे देखील निधन झाल्याने भगवान चौधरी यांचा मुलगा सतीश चौधरी हा एकटा पडला. वडिलांचा जागेवर नोकरी मिळावी व त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करावे. या भावनेतून सतीश चौधरीने आपली समस्या पारोळा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली. याची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष करण पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सतीश चौधरी याच्या लग्नाच्या दिवशीच त्याला त्याच्या विवाह भेटीतच नोकरीचे नियुक्ती पत्र देऊन त्याला अनोखी भेट दिली.  यावेळी त्याचा आनंद द्विगुणित केला.

विवाहच्या मंगलमय वातावरणात नगराध्यक्ष करण पाटील  यांनी नोकरीचे नियुक्ती पत्र देऊन नातेवाईकांना सुखद धक्का दिला. सतीश चौधरीला कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याने नगराध्यक्ष करण पाटील यांचे चौधरी कुटुंबीयांनी व नातलगांनी आभार मानले.

समाजमनात भगवान चौधरी यांनी पालिकेत काम करत असताना नाव लौकिक मिळवला होता. मात्र अचानकपणे त्यांचे निधन झाले. मुलांना उच्चशिक्षित करून नोकरी मिळावी या आशेने ते काम करीत होते. मात्र काळाने घात घालून त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र पालिकेच्या जागेवर सतीश रुजुवावा अशी कुटुंबाची इच्छा होती. मात्र योग्य पाठपुरावा होत नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. सदर बाब ही नगराध्यक्ष करण पाटील यांच्या लक्षात चौधरी कुटुंबीयांनी आणून दिली असता.

तात्काळ दखल घेत पारडा नगरीचे नगराध्यक्ष करण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता शासन दरबारी पाठपुरावा करून त्याला तात्काळ वडिलांच्या  जागेवर शिपाई म्हणून नोकरी दिली. यासाठी पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्योती भगत (पाटील), कार्यालयीन अधिक्षक संगमित्रा संदानशिव, लिपिक लांबोळे कर्मचार्‍यांच्या मदतीने व योग्य तो पाठपुरावा करून अखेर सतीश चौधरी यास लग्नाच्या दिवशीच नोकरीचे नियुक्ती पत्र मिळाल्याने  त्याचा आनंद द्विगुणित झाला.

 

दरम्यान सतीश चौधरीला पालिकेत कायमस्वरूपी  नगराध्यक्ष करण पाटील यांच्या मदतीमुळे नोकरी मिळाल्याने सर्वांनी नगराध्यक्ष करण पाटील यांचे अभिनंदन करून खरोखर जाण ठेवून दिलेला शब्द पाळल्यामुळे कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.