Saturday, January 28, 2023

पारोळा नगरपालिकेकडून ग्रंथ प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन

- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील नपाकडून आज दि १६ ते १८ या काळात कै ह. ना. आपटे मोफत वाचनालयात ग्रंथ प्रेमींसाठी ग्रंथ प्रदर्शन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार तर उद्घाटक म्हणून पारोळा येथील राज्य आदर्श शिक्षक स. ध. भावसार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

यावेळी स्पर्धा परीक्षा पुस्तके लोकार्पण सोहळा होणार असून या पुस्तकामुळे शहरातील युवकांना पुढील भविष्यात त्यांच्या ज्ञानात भर पडेल, तसेच  भावी पिढीस जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त होण्यासाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येईल.

- Advertisement -

यावेळी नगराध्यक्ष करण पवार यांनी सांगितले की,  पारोळा शहरातील तरुण- तरुणींसाठी आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत.  शहरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असून त्यांना योग्य मार्गदर्शन व नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांची आवश्यकता आहे.  त्यादृष्टीने नगरपालिकेच्या वतीने नवीन दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

पारोळा शहरातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी बैठक व्यवस्था लवकरच वाचनालयात करून देण्यात येणार आहे.  तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नगरपालिका वाचनालयात आपल्या नावाची नोंदणी करावी, सदर सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी केले आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे