Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पारोळा नगरपरिषद निवडणूक : भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता
    जळगाव

    पारोळा नगरपरिषद निवडणूक : भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा नगरपरिषद निवडणूक : भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता

    चंद्रकांत पाटील नगराध्यक्षपदी विराजमान

    पारोळा (प्रतिनिधि ) : पारोळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात सुरुवात झाली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणीनंतर दुपारपर्यंत निकाल जाहीर झाले असून, भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण २५ जागांपैकी युतीला २० जागांवर विजय मिळाला असून, नगरपरिषदेवर युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.

    निकाल
    भाजप : १३ जागा
    शिवसेना (शिंदे गट) : ७ जागा
    जनाधार विकास पार्टी : ३ जागा
    अपक्ष : २ जागा

    नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांना ९,४८६ मतें मिळाली असून, प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत त्यांनी नगराध्यक्षपद पटकावले.

    निकाल जाहीर होताच युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा झाला. या विजयानंतर आमदार अमोल पाटील यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. युतीच्या या यशामुळे पारोळा शहराच्या विकासाला नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आगामी काळात युतीचा कारभार अधिक गतिमान होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif