पारोळा तालुक्यात शेतकऱ्यांची आत्महत्या

0
पारोळा–प्रतिनिधी
तालुक्यातील चहुत्रे येथील शेतकर्यांने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली,चहुत्रे येथील शेतकरी विष्णू मकुंदा पाटील (५५) यांनी कर्जबाजारी ला कंटाळून दि, २८ रोजी आपल्या राहता त्या घरात विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची खबर त्यांचे भाऊ दंगल पाटील यांनी दिली, या बाबत असे की विष्णू पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून शेतीसाठी हातऊसनवारी व विकासो चे मिळुन ३लाख रूपये कर्ज घेतले होते, परंतु सतत च्या दुष्काळामुळे हा आकडा वाढत जात असल्याने त्यांना नैराश्य आले होते तसेच त्यांच्या पत्नी चे ही निधन झाले असल्याने त्यांना एकटेपणा वाटत होते, त्यामुळे त्यांनी दि, २८ रोजी दुपारी १ वाजता आपल्या राहता त्या घरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याचे समजले त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, व दोन मुली असा परिवार आहे, याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रविंद्र रावते हे करीत आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.