पारोळा(प्रतिनिधी) : आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात २१ जण हे कोरोना बाधीत आढळुन आले आहेत. यात ग्रामिण भागातील २० जंणाचा समावेश आहे.
पारोळा शहरापेक्षा तालुक्यातील ग्रामिण भागात कोरोना चे संकट वाढत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.
या आगोदर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात जाणवत होता. परंतु आता कोरोनाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविल्याचे दिसत आहे. या मुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन एरंडोल विभागाचे प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. त्यांनी सांगीतले की बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळा,दिवसातुन ३ ते ४ वेळा गरम पाणी प्या रात्री झोपताना गरम पाणी किंवा हळद युक्त दुध प्या,बिना दुधाचा चहा प्या,यात तुळशीचे पान अद्रक लवंग आणी गवती चहा टाका,आयुष काढा घ्या,पुरेशी झोप घ्या,नियमित सकस आहार युक्त जेवण करा,कामाशिवाय घराबाहेर पडु नका लग्ण अंत्यविधी अश्या ठिकाणी गर्दी करणे टाळा,नेहमी माॅस्क चा वापर करा,ताप खोकला,सर्दी,घसा दुखणे,खुप थकवा येणे,तोंडाची चव जाणे वास न येणे अशी लक्षणे
आढल्यास तात्काळ सरकारी दवाखान्यात तपासणी करून घेणे व डाॅक्टराच्यां सल्ल्या नुसार उपचार करावे,कोणते ही लक्षणे लपवु नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन येथिल प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णाचा परिसर असा
सरकारी कोव्हीड पाॅझीटीव्ह/निगेटीव्ह रिपोर्ट
एकुण प्राप्त रिपोर्ट ७७
निगेटीव्ह ५६
पाॅझीटीव्ह २१
सिध्दार्थ नगर स्ञी वय २२
कन्हेरे ७ पुरूष वय ६८,४०,३५,२१,२६,२५,५३,३
स्ञीया १४,४०,४०,
भोलाणे १ पुरूष वय ३०
विटनेर(६) ३ पुरूष वय २०,६३,३९,३ स्ञीया ५६,७५,३५,
वाघरे १ पुरूष वय १८
महाळपुर १ स्ञी वय ४७
बहादरपुर १स्ञी वय ३९ असे आहेत अशी माहीती प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.

