पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यात एकूण ५ महसूल मंडळ असून पारोळा, बहादरपूर, शेळवे, चोरवड, तामसवाडी मंडळातील शेतकऱ्यांनी कापूस पिकासाठी एकूण शेतकरी संख्या १२२९० एकूण क्षेत्र १३७८९ हेक्टर रक्कम रु.२५कोटी११लाख व ज्वारी, मका, बाजरी, उडीद पिकासाठी एकूण संख्या ६१९एकूण क्षेत्र5५१८,३३हेक्टर रक्कम रु.६१लाख साठी विमा कंपनी कडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरणा केला होता.पीक विमा मंजुरीसाठी सतत पाठपुरावा करून आ.चिमणराव पाटील यांनी शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.आ. पाटील, तहसीलदार गवंदे, ता.कृ.अधिकारी वारुळे,गटविकास अधिकारी श्रीमती गायकवाड व सर्व सहकारी यांचे आभार मानून प्रसिद्धीस प्रा.आर.बी.पाटील तालुका प्रमुख यांनी कळविले आहे.


