पारोळा तालुक्यातील महावितरणचे पाच सबस्टेशन थकबाकीमुळे सील !

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील महावितरणच्या पाच सबस्टेशन थकबाकी मुळे सील करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  विधुत विभागाने तहसिल कार्यालयात व शासकीय गोदामात थकबाकी मुळे येथील विधुत पुरवठा खंडित केल्यानंतर महसुल विभागानेही थकबाकी चे कारण पुढे करत आपल्या पथकास थकबाकी वसूलीचे आदेश दिले व पथकास पाठवुन विधुत विभागांच्या पारोळा येथील १३२ के व्ही, सह बहादरपुर, तामसवाडी, सावखेडा होळ, मंगरूळ व रत्नापिंप्री, सबस्टेशन ला सील केले. या वेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, शहर तलाठी निशिकांत पाटील, गौरव लांजेकर, एम, आर, सुतार, यांच्या पथकाने पारोळा येथील १३२ के, व्ही, सबस्टेशन वर कारवाई केली तर ग्रामीण भागातील सबस्टेशन वर मंडळ अधिकारी व ज्या त्या गावातील तलाठी यांनी त्यांच्या गावातील सबस्टेशन वर सील करून कारवाई केली, या वेळी महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पारोळा सबस्टेशन कडे ६४ हजार तर इतर सबस्टेशन कडे पाचही सबस्टेशन मिळुन ५० हजार रुपये अशी एकूण एक लाख पाच हजार रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.