पारोळा तालुका शिक्षक संघटनेची कुटीर रुग्णालयास मदत

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा कुटीर रुग्णालयास प्रशासनाच्या आवाहाना नुसारआॅक्सिजन काॅन्ट्रेटर,व जनरेटर घेण्यासाठी मदत निधी जमा करावी या अनुषंगाने पारोळा तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून जाहिर आवाहन करण्यात आले होते त्या आवाहनास पारोळा तालुका प्राथमिक शिक्षण विभाग अधिकारी, शिक्षक बंधू , बघिनी व शिक्षण प्रेमी यांनी भरभरून मदत केली. जवळपास १ लाखाचा वर निधी जमा झाला.जमा झालेल्या निधीतुन कॉटेज हॉस्पिटल साठी जनरेटर बसविण्यात येणार आहे. या निधीचा धनादेश आज रोजी पारोळा गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे व  शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकात चौधरी यांच्या हस्ते पारोळा तहसिलदार  गवांदे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.योगेश सांळुखें यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. सदरील कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल चौधरी , गुणवंत पाटील, राजेंद्र बाबुराव पाटील, रविंद्र पाटिल, गिरीष वाणी,मनेश शिंदे, चंद्रशेखर देसले, प्रविण कोळी,   सचिन देशमुख, देविदास सोनवणे, सचिन पाटिल, गोपाल पाटील, अनिल पाटील, दिपक गिरासे, जयप्रकाश सुर्यवंशी, सुनिल जाधव,नाना मराठे, सुभाष निळ, प्रशांत पाटिल,  निलेश पाटील नगरसेवक पी जी पाटील.इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार अनिल गवांदे यांनी प्रा शिक्षक संघटनेचे विशेष कौतुक करत स्पष्ट केले की सामाजिक असो की राजकीय निवडणुकांचा विषय असो प्रा शिक्षक नेहमी मदतीला पुढे असतात त्या मुळे खऱ्या अर्थाने लोकसहभाग होत असतो प्रशासनास अश्या गरजू व मदतकार्य करणाऱ्या मंडळींना नेहमी मदती साठी आग्रह राहील असे आपल्या मनोगतात स्पष्ट केले. तर नगरसेवक पी जी पाटील यांनी आपल्या मनोगतात तालुका व शहर असो जिथे जिथे लोकसहभाग आला त्या वेळी अभय पाटील यांनी आपल्या  सोशल मीडिया द्वारे लोकसहभाग गोळा करून मग ते कुठे आगीत नुकसान असो की ,नैसर्गिक आपप्ती असो की कोरोना मदत असो त्यांनी पुढाकार घेऊन समाजाला मदत दिली आहे सामूहिक मदती साठी कोणी तरी पुढे आले पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केले . सुत्रसंचलन अनिल चौधरी यांनी केले. आभार नगरसेवक पी जी पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.