पारोळा – येथील कुटीर रुग्णालयात एक डिसेंबर रोजी एड्स दिवस साजरा करण्यात आला.
सामाजिक एकता सामाजिक जबाबदारी हे जागतिक एड्स दिवसाचे घोषवाक्य आहे जागतिक एड्स दिनानिमित्त कुटिर रुग्णालय पारोळा येथे पोस्टर प्रदर्शन व शपथ ग्रहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन कुटिर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. शपथविधीच्या कार्यक्रमाला रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व डॉक्टर व रुग्ण हजर होते जागतिक एड्स दिनाच्या दिवशी कार्यक्रमाला संबोधित करताना डॉक्टर योगेश साळुंखे यांनी सांगितले की जास्तीत जास्त लोकांनी एच आय व्ही तपासणी करावी व गरोदर माता व क्षयरोग रुग्णांची तपासणी आवश्यक आहे तसेच कुटिर रुग्णालय पारोळा येथे आयसीटीसी विभागामार्फत एच आय व्ही तपासणी मोफत केली जाते व या एसीटीसी विभागांमध्ये एच आय व्ही एड्स व गुप्तरोग याविषयीची माहिती गुप्त ठेवून समुपदेशन केले जाते व माहिती ची गुप्तता व गोपनीय ठेवली जाते तसेच आयसीटीसी विभागात लींक ए आर टी सेंटरमध्ये पी एल, एचआयव्ही लोकांना औषधे मोफत दिली जातात. या कार्यक्रमाप्रसंगी डाँ योगेश साळुंखे, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर हेमंत चौधरी, आयुष विभागाचे डॉक्टर नईम बेग, परिचारिका श्रीमती चौधरी तसेच कार्यालयीन अधीक्षक श्रीमती बागुल, सिनियर क्लर्क संजय पाटील, रमेश पाटील, राजू बाविस्कर, राजू सोनार,आय सी टी सी विभागाचे समुपदेशक नामदेव आहीरे, किशोर पाटील, प्रयोगशाळा तज्ञ बबन महाजन व औषध निर्माता अधिकारी सतीश येवले, भगवान चौधरी, राजू वानखेडे,दीपक सोनार,दीपक पाटील व सर्व कर्मचारी वृंद हजर होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.