पारोळा उपननगराध्यक्ष पदी दिपक अनुष्ठान यांची बिनविरोध निवड

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथील नगरपालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली होती. जयश्री बडगुजर यांचा उपनगराध्यपदाचा सहा महिण्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.या रिक्त झालेल्या पदासाठी  दि,२१ रोजी दुपारी १२ वा, निवडणुक घेण्यात आली. त्यात निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार अनिल गवांदे होते. वेळेच्या आत दिपक अनुष्ठान यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अनिल  गवांदे यांनी केली.

दरम्यान निवडीची घोषणा होताच दिपक अनुष्ठान यांच्या कार्यकर्ते,हितचिंतक आणि समर्थकांनी नगर पालिका चौकात जल्लोष केला.

यावेळी तहसीलदार अनिल गवांदे,मुख्यधिकारी ज्योती भगत, दिपक अनुष्ठान यांचे मोठे बंधु पिरन अनुष्ठान,लहान बंधु अनिल अनुष्ठान, नगरसेवक मंगेश तांबे,बापु महाजन,कैलास चौधरी,प्रकाश महाजन,भैय्या चौधरी,सुधाकर पाटील,मनीष पाटील,संजय चौधरी,पी जी पाटील,प्रकाश वाणी,अरुण चौधरी,कैलास महाजन,अमोल चौधरी,गौरव बडगुजर,कैलास पाटील, माजी नगरसेवक बापु वपार,राजु हिम्मत पाटील,सुनिल भालेराव, तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते तर नगरपालिकेचे  सुभाष थोरात,करनिरीक्षक संदिप साळुंखे,अभियंता पंकज महाजन यांच्यासह  नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे हेच माझे ध्येय ; करण पवार 

आज दीपक भाऊ अनुष्ठान यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली, कै. आमदार आप्पासाहेब भास्करराव राजाराम पाटील यांनी दाखवलेल्या मार्गावर मी माझे समाजकारण व राजकारण करीत आहे, राजकारणात मतांचे गणित आखून निर्णय घेतले जातात. ज्याचा समाज जास्त त्याला पद जास्त. परंतु राजकारणात मी माझे ध्येय ठरवले आहे समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा….याच्या अगोदर पारोळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते पी.जी. पाटील यांना मी स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली आणि corona काळात त्यांनी शहर वासींयांनसाठी  मदतीचे कार्य करून आम्ही केलेली नियुक्ती १००% योग्य होती ते त्यांनी सिद्ध केले. त्याच प्रमाणे मागील चार वर्षा पासुन शहरातील आरोग्याची जवाबदारी  आरोग्य सभापती असताना दीपक भाऊंना दिलेली  जबादारी त्यांनी चोख प्रमाणे राबविली. त्यांचे हे कार्य गौरवास्पद आहे.

सांगायचा मुद्दा एवढाच की शहरात इतिहासात काय झाले ते माझ्या साठी महत्वाचे नाही, पण आज मला चांगल्या लोकांना, कार्यकर्त्यांना, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा आहे, आणि माझी वाटचाल त्याच प्रगती पथावर आहे असे आजच्या  उपनगराध्यक्ष पदाच्या निर्णयाने मला वाटते..

Leave A Reply

Your email address will not be published.