भुसावळ ;– येथील जामनेर रोडवरील श्री. गजानन महाराज देवस्थानतर्फे उद्या दि.3 मार्च रोजी श्री. संत गजानन महाराज यांच्या 146 व्या प्रकट दिनानिमित्त सामूहिक पारायणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थानातर्फे भाविकांना दिवसभर महाप्रसानाचे वाटप करण्यात येणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही प्रकटदिनानिमित्त प्रारंभी श्रींचे स्नान-अभिषेक पूजा पहाटे 5.30. ते 7.30, सामूहिक पारायण सकाळी 6 वाजेपासून तसेच महाप्रसाद वाटप सकाळी 9 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच ज्या भाविकांना महाप्रसादासाठी काही साहित्य अथवा देणगी द्यावयाची असेल त्यांनी जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरात विश्वस्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.