पाय घसरून विहिरीत पडल्याने मेहूतील शेतकऱ्याचा मृत्यू

0

पारोळा | तालुक्यातील मेहू येथे शेतीला पाणी सोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.१५ रोजी घडली. भगवान पाटील (वय ४४) असे या शेतकऱ्याचे नाव आहे

भगवान पाटील हे १५ रोजी नियमित सकाळी ७ वाजता आपल्या शेतात गेले होते. ते विहिरीजवळ गेले असता त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वेळी त्यांचे लहान बंधू दीपक पाटील हे शेतात आले असता त्यांना भावाची मोटरसायकल व चप्पल दिसली. परंतु भाऊ दिसून न आल्याने त्यांनी विहिरीत बघितले असतात ते पाण्यात पडलेले दिसून आले. त्यांनी ग्रामस्थांना बाेलावले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.