निंभोरा :- येथील शेतमजूर तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. पंकज धनराज भंगाळे (वय ३३) असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याबाबत निंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात अली आहे.
अनिल कोळंबे यांच्या गट क्रमांक १२६७ मध्ये पाणी पिण्यासाठी पंकज गेला होता. मात्र, पाय घसरल्याने विहिरीत पडला. यानंतर त्याचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर मंगळवारी सायंकाळी गावात अंत्यसंस्कार झाले. मनोहर भंगाळे यांच्या खबरी वरून निंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.