मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संचार बंदी लागल्याने रामनवमीचे औचित्य साधत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख छोटू भोई यांनी परप्रांतीय घरी पायी जात असल्याने तसेच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जेवण वाटप करून राम नवमी साजरी केली आहे.
कोरोना विषाणूच्या महामारी पासून वाचण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करून सर्वत्र येण्या जाण्याची परिस्थिती तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केला आहे परंतु अशा मध्ये जे रुग्ण दवाखान्यांमध्ये आहेत अशा रुग्णांना घरून जेवण आणणे तसेच हे ये-जा करणे जिकरीचे ठरत आहे त्यामुळे आज श्रीराम नवमी चे औचित्य साधत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख छोटूभोई यांनी आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन रुग्णांना जेवण वाटप केले तसेच पुणे मुंबई सारख्या ठिकानाहून जे परप्रांतीय स्व घरी पायी ये-जा करत आहेत अशांना महामार्ग 46 वर बसवून त्यांना ही जेवण वाटप केले आहे.
तसेच शहरात पोलिस कर्मचारी व नगर पंचायत कर्मचारी हे नागरिकांच्या सुरक्षेकरिता रस्त्यावर दिवसभर थांबून कर्तव्य बजावत आहे या नागरिकांना सुद्धा छोटूभोई यांनी जेवण वाटप केले. भिला वाणी व त्यांच्या परिवाराने कोणताही मोबदला न घेता गरजु करिता रुचकर आणि स्वादिष्ट जेवण हे तयार करून दिले या कार्यक्रमाला अफसर खान धनंजय सापधरे शुभम तळेले भिला वाणी शेख भिकन राहुल शुरपाटनेआशिष भन्साली राजेंद्र तळेले अमरदीप पाटील स्वप्नील श्रीखंडे विश्वनाथ घुले यांनी परिश्रम घेतले