पानी फाऊंडेशन वाॅटर कप स्पर्धेत पारोळ्यातील ६३ गावे सहभागी

0

पारोळा: अभिनेता अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशन च्या सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत पारोळ्यातून ६३ गावे सहभागी झाली आहेत. या सर्व गावांनी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण पुर्ण केले आहे.

मनसंधारणातून जलसंधारण अशा ह्या स्पर्धेत गावकरी श्रमदान व लोकसहभागातून आपलं गाव पाणीदार करण्यास उत्साहीत आहेत. सर्वच गावांमध्ये स्पर्धे पुर्वी करता येणारे सांडपाण्याचे शोषखड्डे, माती परीक्षण, जल बचत, आगपेटी मुक्त शिवार, वृक्ष लागवड या कामांची लगबग चालू आहे. बर्याच गावात हि कामे पुर्णही होत आली आहेत.

आगपेटी मुक्त शिवार – आपल्या शेतातील पिकांचे अवशेष आपण जाळून न टाकता त्याचे कंपोस्ट केले तर त्याचे उत्तम खत तयार होते. ह्या खताने जमीनीचा सेंद्रीय कर्ब वाढून जलधारण क्षमता कमालीने वाढते.

बायोडायनामिक कंपोस्ट महोत्सव – दि. २४ मार्च रोजी पारोळ्यातील गावांमध्ये सेंद्रिय कर्बाचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणार्या बायोडायनामिक कंपोस्ट शेता शेतात करून उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ह्याचे साहित्य अगदी सहज उपलब्ध होणारे आहे. काड्यांची कुट्टी अथवा जनावरांचा खाऊन फेकतो ते चारा, ओला पाला, शेणखत, S9 कल्चर. कृतीही अगदी सोपी आहे. दोन तासात पुर्ण होऊन दोनच महिन्यात उत्तम खत तयार होते. खर्च अतिशय कमी पण खुप उपयोगी असे हे आहे. याकरीता सर्व गावकरी सज्ज झाले आहेत. जागा निवड, साहित्याची जुळवा जुळव तत्परतेने चालू आहे.

स्पर्धेला सुरूवात ८ एप्रिल रोजी होणार असून ४५ दिवस असणार आहे. सर्व गावे तयारीला लागले असून ह्यावेळी वाॅटर कप आपल्याच गावात येणार ही खात्री सर्व गावकरी देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.