Sunday, November 27, 2022

पानसरे हत्याप्रकरणातील आणखी तिघांना अटक

- Advertisement -

कोल्हापूर: ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील आणखी तीन मारेकऱ्यांना आज पहाटे मुंबई, पुणे येथून अटक करण्यात आली. यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या शार्प शूटरचा समावेश आहे.

- Advertisement -

अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी अकरा वाजता तिन्ही मारेकऱ्यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येत आहे. अंदुरे, बद्दी व मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या बारा झाली आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीने याआधी संशयित शरद कळसकर याला अटक केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या