भुसावळ :- रस्त्याने पायी चालणा-या प्रवाशाला अडवून त्यास लुटल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील एका संशयीतास अटक केल्यानंतर दुसर्या संशयीतासही बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नितीन संजय बोयत (19, रा.वाल्मिक नगर, 72 खोली, भुसावळ) याआरोपीस अटक केली आहे 11 जून रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास शहरातील पुरुषोत्तम नगर, गायत्री मंदिराच्या बाजूला तक्रारदार रंगलाल पवार हे पायी जात असताना दोघा संशयित आरोपींनी 22 हजाराची रोकड व सहाशे रुपये किमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केल्यानंतर 12 रोजी जितू एकनाथ घावरे (24, वाल्मिक नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली होती तर दुसरा संशयीत पसार होता. आरोपी चोरवड येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून नितीन संजय बोयत यास अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, शंकर पाटील, चालक हवालदार अयाज, किशोर महाजन, रवींद्र बिर्हाडे, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.