Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पातोंडा येथील जवानाचे आकस्मित निधन ; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
    जळगाव जिल्हा

    पातोंडा येथील जवानाचे आकस्मित निधन ; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2021Updated:October 6, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पातोंडा ता. अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पातोंडा येथील न्यू प्लॉट येथील रहिवासी जवान गणेश भिमराव पाटील (वय ३६) हे सध्या जम्मू काश्मीर मधील सांबा येथे सेवेत असतांना त्याचे काल सायंकाळी आकस्मिक निधन  झाल्याची माहिती मिळाली.

    जवान गणेश भिमराव पाटील  यांच्या निधनाची वार्ता  कळताच कुटूंबांसह गाव परिसरात शोककळा पसरली आहे. गणेश हे १४ मराठा बटालियनमधे सेवेत कार्यरत होते. त्याची आतापर्यंत १६ वर्ष ९ महीने सेवा झाली असून ते येत्या डिसेंबर महिन्यात १७ वर्ष सेवा पुर्ण करून घरी परतणार होते, तितक्यात त्याच्यावर काळाने घाला घातला.

    त्यांचे शव आर्मीचे सर्व शासकीय सोपस्कार पुर्ण करून विमानाने मुंबई व मुंबईहून रुग्णवाहिकेने युनिटच्या सैनिक निगराणीत पातोंडा येथे येणार आहे. त्याकरीता आवश्यक होकार त्यांची पत्नी सीमा हिने आर्मी अधिकाऱ्यांना कळवले असल्याचे समजते. गणेश यांचा अंत्यसंस्कार शक्यतोवर ७ रोजीच पातोंडा येथे सर्व शासकीय इतमामात होणार आहेत.

    गणेश यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी सीमा, दोन मुली असा परीवार आहे. शहिद गणेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी समस्त गावातील तरुण वर्गाने पुढाकार घेतला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Amlner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif