पारोळा- येथील प्रभाग क्रमांक १मधील व कुरेशी मोहल्यात गेल्या २० ते २२ दिवसांपासून नळाना पाणी आलले नाही, या करीता या भागातील महिलानी पालिकेवर मोचाॅ काढून मुख्याधिकारी यांच्या कडे तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली.
सिद्धार्थ नगर व कुरेशी मोहल्या लगतच्या परीसरात दोन दोन वेळा पाणी सोडले जाते. पंरतु आमच्या भागात पाणी न सोडता आम्हाला पाण्या पासून वंचित ठेवुन पाण्यात राजकारण केले जाते असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. पाण्यात राजकारण न करता नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी या भागातील रहीवासी गौतम जावळे, जावेद कुरेशी, राजु सरदार, याच्या सह अनेक महीलानी केले आहे.
यावेळी मुख्याधिकारी यांच्या दालनात महिलासह या भागातील नागरिकांनी जो पंयॅत पाणी सोडण्याचे आश्र्वासन मुख्याधिकारी देत नाहीत तो पंयॅत मोचाॅ येथेच राहील असे सांगितले, तर मुख्याधिकारी डॉ, सचिन माने व पुरवठा अभियंता पंकज महाजन यांनी महिलाना व नागरिकांना शांत करत, पाण्याच्या टाकी जवळील व्हाॅल खराब झाल्यानें पाणी पुरवठ्यावर परीणाम झाल्या चे सांगितले दुरूस्ती होईस्तोवर टेंकर ने आपल्या भागात पाणी देण्याचे सांगितले.
लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहे -करण पवार
काही तांत्रिक अडचणी येत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, पंरतु लवकरच तांत्रिक अडचणी दुर करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे पारोळा नगर पालिका चे नगराध्यक्ष करण पवार यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना सांगितले.