पाणी पुरवठा योजनेवर होणारी लोडशेडिंग बंद करा ; भाजपचे निवेदन

0

वरणगांव  : शहराला तपत कठोरा येथुन होणाऱ्या पाणी पुरवठा योजने वर गेल्या दहा ते पंधरा दिवसा पासुन विजेच भारनियमन होत असल्याने भर उन्हाळ्यात शहरवाशीयाचे पाण्यासाठी हाल होत असल्याने या योजने वरील भरनियमन तात्काळ बंद करून नियमीत विज पुरवठा सुरु ठेवण्यासाठी शहर भाजपा कडून विज अधिकाऱ्यास निवेदन देऊन मागणी केली.

शहराला पाणी पुरवठा करणारी तपत कठोरा येथुन जॉक वेल योजनेवर गेल्या दहा ते पंधरा दिवसा पासुन दिवसा पासुन सतत विज पुरवठा खंडीत करीन भारनियमन केले जात असल्याने ऐन उन्हाळ्या शहरवाशीयाना पाण्यासाठी भंटकती करावी लगत आहे तर मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान महिण्यात पाण्याची मोठी समस्या जानवत असल्याने या विषयी तिव्र संताप व्यक्त केला जात असल्याने शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विज वितरण उपकार्यकारी अभियंता गाजरे व शाखा अभियता कुशवा यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा योजने वरील भारनियमन तात्काळ .बंद करा अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशार दिला आहे
यावेळी अल्लाउद्दीन शेठ सुनिल माळी, श्यामराव धनगर, आकाश निमकर, अजय पाटील, किशोर सोनार, गोलू राणे , हितेश चौधरी, विक्रांत चंदेलकर , नरेंद्र बावणे , संजय बेदरकर बाळा गुजर, बंटी सोनार , कुंदन माळी इत्यादी निवेदन देते वेळी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.