पाणी टंचाई काळात पोलिस पाटलांनी सहकार्याची भूमिका ठेवावी

0

पोलिस निरीक्षक अनिल शिंदे

पाचोरा | प्रतिनिधी 

तालुक्यात भिषण पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे, गावपातळीवर पाण्याच्या पाण्यासाठी नागरीकांमधे असंतोषाचे वातावरण आहे. लोकांना रात्री अपरात्री जागून विहिरी आडावरुन मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे पोलीस पाटलांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गावकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी पोलिस पाटलांच्या बैठकीत केले. यावेळी गावात येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी बोलून त्यांचे रजिस्टर तयार करा,पुढील काळात तोंडावर पेरण्या येवू घारल्याने शेतकऱ्यांमधे बांदावरुन भांडणे होतात गावातील किरकोळ भांडणे गावातच मिटविण्याचा प्रयत्न करावा. दिवसेंदिवस भरमसाट प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने कडक उन्हाळा व पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे पोलीस पाटलांनी अवैध वृक्षतोडीकडे काटेकोर पणे लक्ष घालून पावसाळ्यात युवकांचे संघटन करुन गावाच्या चौबाजूला व रस्त्यावर वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे असे आवाहनही पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी केले.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे हवालदार रामदास चौधरी गोडसे, पोलीस पाटील अरुण गोसावी सामनेर, सोनल कदम, नितीन पाटील, शामकांत पाटील, संजय पाटील, दिलीप मोरे, साईनाथ सोनवणे, दिलीप मोरे, शितल देवरे, भारती बेंडाळे, शिद्धार्थ अहिरे, भगवान पवार, ईश्र्वर पाटील, आरती पाटील, सुवर्णा चव्हाण, कल्पना महाजन, कल्पना निंबाळकर सह मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते. या वेळी पोलिस पाटलांनी आम्हास लोकसभा निवडणुकीतील प्रवास भत्ता व निवडणूक भत्ता मिळाला नसल्याची तक्रार करून यापूढे गावपातळीवर पाटलींची बैठक घेण्याची विनंती केली या विनंतीस पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी होकार दिला आभारप्रदर्शन पंकज शिंदे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.