पाणीपुरवठा योजनेला विरोध केल्याचा पुरावा दिल्यास राजकीय सन्यास घेऊ ; राजेंद्र चौधरींचे काळेंना खुले आव्हान
वरणगाव : भारतीय जनता पार्टीने बस स्थानक चौकात पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश तात्काळ देण्या साठी आदोलन केले होते त्यात महा विकास आघाडीच्या नगरसेवकानी या विरोध केला होता आसा आरोप केला त्या आरोपाचे खंडण करून विरोध केल्याचा पुरावा दिला तर राजकिय सन्यास घेऊ असल्याचे गटनेते व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी प्रतीत्तर दिले आहे
– दि. २७ रोजी आयोजित भुसावळ तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत माजी गटनेते तथा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरींनी भाजपाच्या पाणीपुरवठय़ाबद्दलच्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनिल काळेंनी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरु झाली नसल्याच्या आरोप केला होता.
त्या आरोपाचे खंडण करताना राजेंद्र चौधरी यांनी सांगीतल की आम्ही पाणीपुरवठा योजनेला विरोध केल्याचा पुरावा दिल्यास राजकीय सन्यास घेऊ असे प्रतित्तर देऊन आव्हान दिले. वास्तविक पाणीपुरवठा योजनेची वाढीव दराच्या निविदेला विशेष अधिकारातुन स्वतः काळेंनी फेरनिवीदा मागवण्याचे आदेश दिल्यानंतर आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी अंदाजपत्रकात नाममात्र रक्कम कमी करुन त्याच ठेकेदाराला योजनेचे काम देण्याचा घाट घातला गेला. परंतु तसे केले असते तर अंदाजे पावणे तीन कोटी रुपये नगरपालिकेचे जास्तीचे जाणार होते म्हणुन फेरनिविदा मागवण्याची मागणी सर्वपक्षीय एकुण १४ नगरसेवकांनी केल्यानंतर १% कमी दराने निवीदा आल्याने पालिकेचे सुमारे पावणे तीन कोटी वाचले व आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या वरणगाव नगरपालिकेला आधार मिळाला परंतु सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या सर्वच कामांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांनी केलेली टिका हि निव्वळ धुळफेक असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.