रावेर (प्रतिनिधी) :– तालुक्यातील पाडळे बु येथे दारूच्या पाडण्यावरून दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाली. यात एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना काल घडली. तर इतर दोघे जखमी झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, बुधवारी दुपारी दिडच्या सुमारास पाडळे बु येथे दारू पाडण्यावरून वाद झाला. यात मुराद तुराब तडवी (वय 32) या तरुणाचा खून झाला. तर सुलेमान तुराब तडवी, तुराब जाबाज तडवी हे दोघे जखमी झाले आहे. त्यांच्यावर कोयताने वार करण्यात आल्याचे मुराद तडवी यांनी सांगितले. या बाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
