चाळीसगाव : पाटणादेवी मंदीर परिसरात झाडाचा पाला तोडण्यासाठी गेले असता वृद्धाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की चंडिकावाडी येथील रहिवासी हिरालाल चव्हाण (वय 60)हे वृद्ध झाडाचा पाला तोडण्यासाठी पाटणादेवी मंदिर परिसरातील कन्हेरगड रेस्ट हाऊस जवळील झाडावर चढले असता तारेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.