Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पाटणादेवी जंगलात चंदनचोर मुद्देमालासह अटकेत
    जळगाव जिल्हा

    पाटणादेवी जंगलात चंदनचोर मुद्देमालासह अटकेत

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 13, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव | प्रतिनिधी
    तालुक्यातील पाटणा अभयारण्यातून चोरलेल्या सुमारे 13.400 किलो चंदनासह एकाला मध्यरात्रीच्या सुमारास वन विभागाने ताब्यात घेतले. या जप्त केलेल्या चंदनाची किंमत 65 ते 70 हजार रूपये इतकी असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
    या घटनेची माहीती अशी की, पाटणा जवळील चंडीकावाडी येथील कैलास नथू चव्हाण याच्याकडे चोरीचे चंदन असल्याची माहिती पाटणा वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी एम.डी. चव्हाण यांना मिळाली असता श्री. चव्हाण यांच्यासह विभागीय वन अधिकारी एस.पी. काळे, कन्नड विभागाचे आरएफओ राहूल शेळके, वनरक्षक मनिषा त्रिमाळी, शिंदे, वनमजुर कांतीलाल नागरे, नलरवडे, रामचंद्र पाटील यांच्या पथकाने काल दि.12 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास कैलास चव्हाण याच्या घरावर छापा टाकला असता घरात साल काढलेले सुमारे 13 किलो 400 ग्रॅम वजनाचे चंदन मिळून आले. पथकाने चंदनासह कैलास चव्हाण यास ताब्यात घेतले आहे. या जप्त केलेल्या चंदनाची किंमत अंदाजे 65 ते 70 हजार रूपये इतकी असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एम डी चव्हाण यांनी दिली.
    पाटणादेवी गौताळा अभयारण्य हे धार्मिक स्थळ तसेच ऐतिहासिक निसर्गरम्य पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वनस्पती व वन औषधी मुबलक प्रमाणावर आढळतात. यात चंदन देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात चंदन चोरीचे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत. चंदनासह ताब्यात घेतलेल्या कैलास चव्हाण याने अनधिकृतरित्या पाटणा जंगलातील चंदन तोडून त्याचा आपल्या घरात साठा करून ठेवला व तो दुसरीकडे विक्री करण्याच्या तयारीत असतांनाच त्याला पकडल्याचेही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif