भडगाव (प्रतिनिधी) :– पाचोरा शहरात कोरोना च्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दि 10 मे रोजी पासून ते 17 मे तारखेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. पाचोरा शहरापर्यंत आलेला कोरानाचा प्रादुर्भाव भडगावात येऊ नये याकरिता सतर्कता म्हणुन शहरवासीयांनी 17 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन भडगावातील नागरिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत आज दि 9 रोजी सायंकाळी 4 वाजता तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी अत्यावश्यक सेवा दूध व मेडिकल वगळता सर्व दुकाने दि 10 ते 17 तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत तहसीलदार माधुरी आंधळे , पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, काँग्रेस चे जेष्ठ नेते प्रदीप पवार , माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, शशिकांत येवले, गणेश परदेशी, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन मास्टर लाईन कंपनी चे डायरेक्ट समीर जैन, राष्ट्रवादीचे सुरेंद्र मोरे, योजनाताई पाटील, मीना बाग, सेनेचे इम्रान अली भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, प्रकाश भंडारी, अनिल वाघ, प्रहार जनशक्ती चे विजय भोसले, याकूब पठाण, रातीलाल महाजन,
पोलीस कर्मचारी लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, तलाठी राहुल पवार, नितीन पाटील, विकास तोतला, यासह किराणा, दूध डेअरी, हातमाल विक्रीदार उपस्थित होते. यावेळी तहसीलदार माधुरी आंधळे यांनी आपणच आपले रक्षण बनून काम करायचे आवाहन यावेळी त्यांनी केली , शिवाय जनता कर्फ्यु म्हणून मेडिकल व दूध वगळता 17 तारखेपर्यंत बंद पाळण्याचे व प्रशासनाला घरी थांबून मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी कोरोना युद्धात शहीद झालेल्यांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. दरम्यान अनेक मान्यवरांनी सतर्कता म्हणून आपले मत मांडले.