पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यासह शहरात सायंकाळी ५:३० वाजता सुसाट वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. वादळ हे इतके जोरात होते की, काही ठिकाणी मोठं मोठे झाडे कोलमडून पडली. शहरातील भडगाव रोड वरील स्टेट बँकेसमोर एक मोठे झाड अचानक पडल्याने त्याच वेळी चारचाकी तेथुन जात असतांना झाड चारचाकी वर आदळले. सुदैवाने जीवितहानी टळली असुन चारचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी इलेक्ट्रीक खांब, इलेक्ट्रीक तारांसह पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.
आज सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास तालुक्यासह शहरात सुसाट वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. भडगाव कडुन पाचोरा शहरात येणाऱ्या स्टेट बँकेसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक एक मोठे लिंबाचे झाड पडले. त्याचवेळी तेथुन चारचाकी इंडिका (क्रं. एम. एच. १८ डब्लु ७६०४) जात असतांना झाड हे चारचाकीच्या समोरील भागावर आदळले. सुदैवाने चारचाकी तील दोघे जण बालबाल बचावले असुन इंडिकाचे किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यासह शहरात झाडे, इलेक्ट्रीक पोल, इलेक्ट्रीक तारा पडल्याने महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने तालुक्यासह शहरातील इलेक्ट्रीक खांबांजवळील झाडांच्या फांद्यां कटाई करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.