पाचोऱ्यात साकारली साडेपाच फूट उंचीची बुद्ध मूर्ती

0

पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा येथील भीमनगरातील रहिवासी शिल्पकार भिवसने या दोन्ही बंधुनी १५ दिवसांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची साडेपाच फुटांची मूर्ती साकारली. मूर्ती पाचोरा शहरातील समाज बांधवासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला आहे.
भीमनगर, पाचोरा येथील शिल्पकार भिवसने या दोन्ही बंधुनी १५ दिवसांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची साडेपाच फुटांची मूर्ती साकारली. मूर्ती पाचोरा शहरातील समाज बांधवासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला आहे. पाचोरा एम. एम. कॉलेजचे माजी वरिष्ठ लिपीक यशवंत देवचंद भिवसने व त्यांचे लहान बंधू राजेंद्र देवचंद भिवसने या शिल्पकारांनी मुर्ती साकार करण्याची संकल्पना मांडली. एप्रिलमध्ये कामास सुरुवात केली. १५ दिवसात साडे पाच फुटांची सिमेंटची ध्यान मुद्रा अवस्थेतील बुद्ध शिल्प भिवसने बंधुनी साकारले हे विशेष. त्यांनी मुर्ती धम्मदान म्हणून दिली आहे. चित्रकलेची आवड असलेल्या भिवसने बंधुनी आपल्या शिल्पकलेला तथागतच्या मुर्तीपासून सुरुवात केली. त्यांना चित्रकलेची आवड लहान पणापासूनच आहे. बुद्धांचा शांतीचा संदेश व त्यांचे अनुकरण समाजात रुजेल, यासाठी पाचोरा येथे बैठक घेवून बुद्ध विहाराच्या आवारात मुर्ती बनवण्याचा संकल्प केला होता. ध्यान मुद्रा अवस्थेतील मूर्ती परिसरातील सर्वांचे आकर्षण आहे. मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

आत्मविश्वासातुन साकारले शिल्प

पाचोरा येथील भिमनगरातील भिवसने बंधुनी साडे पाच फूट उंचीची बुद्धमूर्ती साकारुन आदर्श निर्माण केला. त्यांनी मुर्तीकलेचे कुठलेही शिक्षण व प्रशिक्षण घेतलेले नसतांना जिद्द, आत्मविश्वासाने बुद्धाचे ध्यान मुद्रेतील आगळीवेगळे शिल्प साकारले. या शिल्पकलेचे पाचोरा शहरातुन कौतुक होत आहे. मुर्ती बनविण्यासाठी त्यांनी आर्थिक मोबदला घेतला नाही. धम्म दान रुपाने मुर्ती लुंबिनी बुध्द विहार समिती भिमनगर यांना साकारुन दिली आहे.

अशी साकारली बुद्ध मूर्ती

पाचोरा शहरातील भिमनगर येथील लुंबिनी बुध्द विहारात तथागत भगवान गौतम बुध्दांची मुर्ती अवघ्या पंधरा दिवसात साकारली आहे. ध्यान मुद्रेतील बुध्द मुर्ती साकारण्यासाठी सिमेंट, लोखंड, खडी व विटांचे तुकडे, रंगकाम आदी साहित्याचा वापर मूर्तीकार भिवसने बंधुंनी केला आहे. ध्यान मुद्रा अवस्थेत असणारी ही भगवान बुद्धांची मुर्ती तब्बल साडे पाच फूट उंचीची आहे. बहुदा जिल्ह्यातील अशी पहिलीच आणि इतक्या उंचीची ही भगवान तथागत गौतम बुद्धांची पहिलीच मुर्ती असावी, असे मानले जात आहे. या शिल्पामुळे पाचोरा शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
पाचोरा शहरातील भिमनगर येथील रहिवासी आणि एम. एम. कॉलेजचे माजी वरिष्ठ लिपीक यशवंत देवचंद भिवसने व त्यांचे लहान बंधू राजेंद्र देवचंद भिवसने या शिल्पकारांनी भगवान गौतम बुद्ध यांची ध्यान मुद्रेतील मुर्ती साकारली. त्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला घेतला नाही. भीमनगर बुद्ध विहार समितीकडे ही मूर्ती एक धम्मदानाच्या रुपात सोपविण्यात आली. त्यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.