पाचोऱ्यात शिवसेनेकडून आशिष शेलार यांच्या पुतळ्याचे दहन

0

पाचोरा (प्रतिनिधी) : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले होते. याचे निषेधार्थ दि. ४ रोजी ४ वाजता पाचोरा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या पुतळ्याला शेण पासुन पुतळ्याचे दहन करण्यात आले. व आशिष शेलार मुर्दाबाद घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारवकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, नगरसेवक सतीश चेडे, बापू हटकर, जितेंद्र पेंढारकर, पिंटू राजपूत, पप्पू जाधव, वैभव राजपूत, तात्या चौधरी, रमेश पाटील (पिंप्री), आण्णा चौधरी, विशाल राजपूत, छोटू चौधरी, संजय राजपूत, मानसिंग राजपूत, नितिन चौधरी शरद भावसिंग पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.