पाचोरा (प्रतिनिधी) : येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल शिवजयंती उत्सव समितीचे संयुक्त विद्यमाने अॅड. विनय दाभाडे यांचे “शिव सह्याद्री” या छत्रपती शिवाजी महाराज चरित्रावर आधारित महानाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दि. २ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर, महानाटकाचे प्रमुख अॅड. विनय दाभाडे, व्यवस्थापक आनंद केसकर, विकास पाटील यांनी दिली. यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे मुकेश तुपे, गणेश पाटील, सुनिल पाटील, नितीन पाटील, प्रदिप पाटील, जिभाऊ पाटील, संजय पाटील, संदिप तांबे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त पुणे येथील कलावंत अॅड. विनय चंद्रकांत दाभाडे, आनंद केसकर यांनी रचलेल्या शिवशंभु चरित्रावर आधारित महानाटकाचे आयोजन येत्या २२ व २३ फेब्रुवारी रोजी श्री. गो. से. हायस्कूल मध्ये करण्यात आले आहे. लिमका गिनिज बुक मध्ये नोंद असलेल्या या महानाटकाचे प्रायोजन येथील प्रसिद्ध डॉ. भुषण मगर हे करणार आहेत. ज्या स्थानिक कलावंतांना महानाटकात सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी आयोजकांकडे उपलब्ध असलेले फार्म भरुन द्यावयाचे आहे. यामध्ये १० ते १५ वर्ष वयोगट, १५ ते २५ वर्ष वयोगट, २५ ते ४५ वयोगट व ४५ ते ६० वर्ष वयोगटातील सुमारे ३०० निडक कलावंतांचा समावेश या महानाटकात करण्यात येणार असल्याचेही अॅड. विनय दाभाडे यांनी यावेळी सांगितले. या महानाटकाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महानाटकात महिला, बालक व वृद्धांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.