पाचोऱ्यात विज वितरण कंपनीवर भाजपाचा हल्ला बोल मोर्चा

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  पाचोऱ्यात लाॅक डाऊनच्या काळात विज वितरण कंपनीने ग्राहकांच्या विज मीटरचे कोणत्याही प्रकारचे रिडींग न घेता अव्वाचे सव्वा विज बिले दिले असुन ती विज बिले कमी करुन मिळावे, याबाबत कोणत्याही परिस्थितीत सक्तीची वसुली करु नये, ग्राहकांचे विज कनेक्शन कट करु नये. या संदर्भात भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व शहर अध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने भाजपा कार्यालयापासुने ते गिरड रोड वरील विज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन व मोर्चा काढला होता. मोर्चानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्याम ए. दासकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. जे. चव्हाण यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

पाचोऱ्यात कोरोना व्हायरसमुळे लाॅक डाऊन सुरू झाल्यानंतर अनेक कामगारांचे हात रिकामे झाले. अनेकांचा रोजगार बुडाला दरम्यान विज वितरण कंपनीने कोणत्याही प्रकारचे विज मिटरचे रिडींग न घेता ग्राहकांना अंदाजे भरमसाठ विज बिले दिली. शहरातील बहीरम नगर मध्ये राहत असलेल्या व पत्राचे दोन रुम असलेल्या यमुनाबाई शंकर राजपुत या महिलेस १ लाख ३ हजार ४० रुपये विज बिल आल्याने भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी निवेदन दिल्यानंतर राज्यातील महाआघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढुन राज्यातील महाआघाडी सरकारने लाॅक डाऊनच्या काळात विज बिले माफ करण्याचे आश्र्वासन दिले होते. मात्र हे सरकार पलटी खावु असल्याने सरकार मधील मंत्र्यांनी विज बिल धोरणाबाबत वर हात केल्याने हे सरकार पलटु व निष्क्रीय सरकार आहे. दरम्यानच्या काळात पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी ग्राहकांना विज बिल न भरण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता विज वितरण कंपनी सक्तीने विज बिल वसुल करण्याची भाषा करत असुनही सत्तेत सामिल असलेले आमदार किशोर पाटील हे विधान भवनात आवाज न उठवता झोपेचे सोंग घेत आहेत.

विज वितरण कंपनी जर सक्तीची वसुली करुन ग्राहकांना त्रास देण्याचे काम करेल तर भाजपा स्वस्त न बसता यापैक्षाही मोठे आंदोलन उभारुन वसुलीस येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करेल असेही अमोल शिंदे यांनी सांगुन महाआघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड, बाजार समितीचे माजी सभापती सतिष शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, अॅड. गोरक्ष पाटील, अॅड. योगेश पाटील, अॅड. राहुल पाटील, हिम्मतसिंग निकुंभ, सुनिल पाटील, प्रशांत नागणे, नरेंद्र पाटील, संजय पाटील, प्रदिप पाटील, दिपक माने, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मुकेश पाटील, स्वीय्य सहाय्यक सिध्दांत पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, यशवंत घोडसे, दिपक सुरवाडे, राहुल सोनवणे, गजु काळे, प्रकाश पाटील, गोपनिय विभागाचे सुनिल पाटील, प्रशांत चौधरी, शिवकुमार ठाकुर, किशोर पाटील, बाळासाहेब पगारे, समिर पाटील, मनोज माळी, अमृत पाटील, मंगलसिंग गायकवाड सह  पोलिसांचा मोठा फौजफाटा संरक्षणार्थ उपस्थित होता.

Leave A Reply

Your email address will not be published.