पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील माहेजी व कुरंगी येथून वाळू वाहतूक करणारे पाच ढंपर व एक ट्रक पोलीसांनी दि.१३ रोजी मध्यरात्री पकडून पाचोरा येथील पोलीस कवायत मैदानावर जमा केल्याने वाळू वाहतूक दारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
कुरंगी व माहेजी येथून मोठ्या प्रमाणात वाळू रात्री अपरात्री वाहत असल्याने अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असून नागरीकांनी जीवन जगणे कठीण झाल्याने येथील नागरीक सुनिल पाटील यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना सहा ढंपर कुरंगी रेल्वे गेट जवळून जात असल्याचे कळविले होते. उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी घटनेविषयी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तातडीने कर्मचारी पाठविल्याने पोलीसांनी एम. एच. १९ – झेड ४६९८, एम एच १९-सी वाय ६११६, एम. एच. २० सी. टी. -६८२९, एम. एच. २० बी. टी-०५५९, एम. एच. १९ सी. वाय.-२०५९ या पाच ढंपरासह एम एच २० टी सी- ५८०२ या ऐका ट्रक सह सहा वाहने पोलीस लाइनीत जमा केली , ही वाहने चाळीसगाव, कन्नड, शेंदुर्णी व जामनेर येथे जात होते. घटनास्थळी कुरंगी येथील नागरीकांच्या मोठ्या जमावाने ढंपर अडवून ठेवले होते. व ते हवालदार रामदास चौधरी, दामोदर सोनार, तुकाराम चौधरी यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाविषयी वाहन चालकांकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी आमचे कडे वाळूचा रितसर परवाना असल्याचे सांगितले. मात्र या वाहनांवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.