पाचोऱ्यात महिलेची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी लाबंवली

0

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील महिलेची भररस्त्यावरुन अज्ञात चोरट्यांनी १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी लाबंवल्या घटना घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कृष्णा दर्शन सोसायटी, भडगाव रोडवरील रहीवाशी सुवर्णा आत्माराम सोनवणे वय – ३४ ह्या दि. २४ रोजी सायंकाळी आपल्या शेजारील महिलांसोबत शतपावली करण्यासाठी जात असतांना राजीव गांधी काॅलनी समोरुन एका मोटरसायकलवर स्वार दोन इसमांनी सुवर्णा सोनवणे यांचे गळ्यात असलेली १० ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी ओरफडुन नेत घटना स्थळावरून थुम ठोकली.  सुवर्णा सोनवणे यांना काही कळायच्या आतच मोटरसायकल स्वार फरार झाले होते. सुवर्णा सोनवणे यांचे पती फौजी असुन ते सद्यस्थितीत सेवा बजावत आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.