पाचोरा – मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकल्याचा जल्लोष पाचोरा शहरात मराठा क्रांति मोर्चासह सकल मराठा समाज च्या वतीने करण्यात आला. मराठा समाजाची आरक्षणाची अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढाई सुरू होती. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ४२ टक्केहुन अधिक मराठा समाजाची लोकसंख्या आहे यात बहुतांश मराठा समाजातील लोक अल्पभुधारक आणि आर्थिक दुर्बल घटकात मोडले जात आहे. मागील सरकारने मागासवर्गीय आयोगाची शिफारस न घेतल्याने न्यायालयात आरक्षण टिकु शकले नाही. त्यामुळे पुन्हा या सरकारने मागील चुक दुरुस्त करून न्या. गायकवाड समितीने अहवाल परीपुर्ण दिल्याने ते न्यायालयात टिकले म्हणून गायकवाड समिती चे अभिनंदन सह मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या निकालामुळे येथील मराठा क्रांति मोर्चा सह सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी मराठा क्रांति मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी धनराज पाटील, प्रा. शिवाजी शिंदे, गणेश पाटील, सचिन पाटील, अॅड. मंगेश गायकवाड, शरद पाटील, डॉ. नंदकिशोर पाटील, आकाश पाटील, विनायक पाटील, तुषार पाटील, भिकन पाटील, आदी उपस्थित होते. सोबत विनोद अहीरे, मंगेश खैरनार, बापु भोई, प्रल्हाद गायकवाड कार्यकर्ते उपस्थित होते.