पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा शहरात मानसिंगका इंडस्ट्रीज जवळ पाचोरा बस स्थानकाकडुन रेल्वे मालधक्क्याकडे भरधाव वेगाने येत असलेल्या एम.एच. १९ – २८२ या ट्रकने पायदळ चालत असलेल्या ९२ वर्षाच्या वृध्दास चिरडल्याने त्यांचा जागेवर मृत्यू झाला. ट्रक चालक ट्रक सोडुन पसार झाल्याने पोलिसांनी ट्रक पोलिस ठाण्यात आणुन लावली. सदरची घटना दि. १७ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान घडली. गोराडखेडा ता. पाचोरा येथील रहीवाशी लाला निंबा पाटील वय – ९२ हे पायी चालत असतांना मागुन भरधाव येणाऱ्या मालवाहु ट्रकने जोरदार धडक दिल्याने वृध्दहा पुढील चाकाखाली आल्याने लाला पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
उर्वरित बातमी वाचा उद्याच्या अंकात….