Saturday, January 28, 2023

पाचोऱ्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ३१५ ईव्हीएम मशिन सज्ज

- Advertisement -

पाचोरा (प्रतिनिधी) :  पाचोरा तालुक्यात ८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २९५ मतदान केंद्र व २० राखीव ईव्हीएम मशिन सेटींग आणि सिलिंगचा कार्यक्रम सारोळा रोडवरील समर्थ लाॅन्समध्ये २० टेबलवर घेण्यात आला. तालुक्याचे मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार कैलास चावडे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संभाजी पाटील, गट विकास अधिकारी अतुल पाटील, अजिंक्य आंधळे, दिपाली ब्राम्हणकर, भागवत पाटील, मोहन सोनार, भरत पाटील, मनोज तिवारी सह विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी काम पाहिले.

पाचोरा तालुक्यात १०० पैकी ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असुन यात दि. ४ जानेवारी २०२१ रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी, वेरुळी बु”, वेरुळी खु”, सारोळा बु”, सारोळा खु”, दिघी, सांगवी प्र. लो., शहापुरा, रामेश्वर, वरसाडे प्र. बो. वडगांव मुलाने, चिंचपुरे, राजुरी या १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ८४ ग्रामपंचायतींसाठी ६२७ सदस्यांसाठी १ हजार ४०४ उमेदवार आपले नशिब आजमवीत आहे. या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सारोळा रोडवरील समर्थ लाॅन्समध्ये ईव्हीएम मशिन सेटींग व सिलिंग चा कार्यक्रम दि. ११ जानेवारी २०२१ रोजी हाती घेण्यात आला होता.

यात ईव्हीएम मशिनवर मत पत्रिका अनुक्रंमाकानुसार लावणे व ते उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी यांचे समोर ईव्हीएम मशिन सिलींग करणे यासाठी पाचोऱ्याचे निवडणुक निर्णय अधिकारी राजु ढेपले, ईश्र्वर देशमुख, अशोक जाधव, सुनिल पाटील, राजकुमार धस, मिलींद मोरे, गोकुळ कच्छवा, संजीव पाटील, के. व्ही. चुन्ने, कैलास घोंगळे, प्रशांत पाटील, एस. टी. मोरे. शंकर धनराळे, प्रभाकर ढुंमसे, उमेश पाटील, निलेश पाटील, विजय धनराळे उपस्थित होते. दि. १५ जानेवारीला मतदान झाल्यानंतर याच समर्थ लाॅन्समध्ये सकाळी सात वाजेपासून मत मोजणीस प्रारंभ होणार आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे