पाचोऱ्यात कोरोनाच्या बचावासाठी तातडीची विभागीय बैठक

0

पाचोरा | प्रतिनीधी

पाचोरा, भडगाव तालुक्यातील कोरोनाची लागण टाळण्यासाठी तातडीने उपयोग करून शहरी भागात जागोजागी जनजागृती पर बॅनर लावून घरोघरी जाऊन पॉम्पलेटचे वाटप करा, शिक्षाच्या व घनकचरा जमा करणाऱ्या वाहनावर कॅसेट लावून तर ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य सहायक यांच्या माघ्यमातून प्रचार व प्रसार करा यासाठी ग्रामपंचायतीने ग्राम निधीच्या माध्यमातून प्रत्येक चौकाचौकात व प्रभागात शासनाचे दिलेल्या बॅनर लावा, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित  विभागीय    बैठकीत कोरोनाबाबत केले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी या आजाराच्या बचाव,प्रचार व प्रसारासाठी आमदार निधीचा वापर करता आल्यास तेही करु असेही सांगितले. बैठकीत उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, तहसिलदार कैलास चावडे, माधूरी आंधळे, नगराध्यक्ष संजय गोहिल, गटविकास अधिकारी विलास सनेर, दिलीप सोनवणे, पालिकेचे अधिकारी शोभा बाविस्कर, विकास नरवळे (भडगाव) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. सुचिता अटकडे( भडगाव) शिक्षणाधिकारी विकास पाटील प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले उपस्थित होते.

पाचोरा येथे झालेल्या विभागीय बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांनी कोरोनाची लक्षणे, तो होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या बाबत सखोल माहिती देवुन प्रोजेक्टर द्वारे जिवाणू आणि त्याची लागण होण्यापासून रोखणेसाठी घ्यावयाची काळजी विषयी माहिती दिली, ग्रामीण भागात आशा स्वयमसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेवक सेवकांकडून प्रचार आणि प्रसार सुरू असल्याचे सांगितले,कोरोना बाबत दिनांक १८ रोजी जिल्हा स्थरावर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तर दिनांक १९ रोजी तालुका स्थरावर आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगून या आजाराचा संशयित रुग्ण आढळल्यास किंवा तसे लक्षणे दिसू लागताच त्यांनी वैद्यकीय अधिऱ्यांकडे जावून उपचार करुन घ्यावेत,उपचानंतर रुग्णात कोरोनाचे लक्षणे आढल्यास त्यास वैद्यकीय महाविद्यालय जळगांव व गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय साकेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात येईल,त्यासाठी स्वतंत्र ५०० खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगून या आजाराची भिती बाळगू नका मात्र काळजी घ्या कसेही त्यांनी सांगितले.

वेळीच दक्षता घ्या, घाबरु नका- उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे

जळगांव जिल्हयात अद्याप एकही रुग्ण आढललेला नसून बाहेर गावाहून येणाऱ्या नागरीकांनी आपली आरोग्य तपासणी करुन घ्या, पाचोरा मतदार संघातील सर्व शाळा, महाविद्यालय, प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, खाजगी शिकवण्या, चित्रपट गृहे, सभा, समारंभ, यांचेवर बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी लग्न समारंभात अथवा घराच्या वास्तूशांतीसाठी नागलरीकांचा मोठा जमाव जमवू नये असे केल्यास आयोजक व संयोजकावर कारवाई करण्यात येईल,केवळ हिंदु कायद्या नुसार घरगुती कार्यक्रम करण्यास परवानगी आहे.

खोट्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार – पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे 

कोरोना आजारा बाबत कोणीही व्यक्ती व्हॉटसप, फेसबुक अथवा अन्य कुठलाही वेफसाईटवर खोट्या अफवा पसरवतील अशांवर पोलीस नजर ठेवून असुन त्यांचेवर त्वरीत कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सांगितले.

शहरात चौकाचौकात बॅनर लावून जनजागृती करणार – मुख्याधिकारी शोभा बाविस्कर 

पाचोरा नगरपरीषदेने सफाई कामगारांसाठी १५० मास्क मागविण्यात आले आहेत,या शिवाय त्यांना हॅन्ड ग्लोज देवून संपूर्ण शहराची साफ सफाई करण्यात येणार आहे. शहरात पाच बॅनर लावण्यात आले आहे. व लवकरच चौकाचौकात ५० बॅनर लावून कोरोनाच्या जनजागृतीसाठी रिक्षा व घंटा गाड्यांवर कॅसेट वाजविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.