सुदैवाने जिवीतहानी टळली
पाचोरा ;- पाचोरा येथे कापसाने भरलेला ट्रक दि. १७ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाटा तुटून पलटी झाला. पहाटेची घटना असल्याने रहदारी कमी प्रमाणात होती. सुदैवाने जिवीतहानी तसेच मोठा अपघातही टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिल्लोड हुन गुजरात (अमरेली) येथे १० टन कापसाने भरलेला ट्रक (क्र. एम.एच. २० सी.टी. ७०११) हा दि. १७ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शहरातील हिवरा नदीच्या पुलाजवळील दुभाजकास धडकला. व ट्रकचा पुढील मेन पाटा तुटून रोडाच्या मध्यभागी पलटी झाला. ट्रक चालक (मालक) अल्ताफ पठाण व क्लिनर यांना कुठल्याही प्रकारची दुखापत न होता ते सुखरूप बचावले. पहाटेची घटना असल्याने रहदारी कमी प्रमाणात होती व पुढील होणारा अनर्थ ही टळला. पलटी झालेला ट्रक हटविण्यासाठी धुळे येथुन क्रेन बोलविण्यात आली. दुपार पर्यंत वाहतुकीस खोडंबा निर्माण झाला होता. ट्रक हटवुन वाहतूक पुर्ववत करण्यात आली.
दुभाजक ठरता आहेत अपघाताला कारणीभूत
शहरात बाय पास हायवेवर रस्त्याच्या मधोमध दुभाजक बनविण्यात आले आहे. परंतु हेच दुभाजक अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. रात्रीच्या वेळी समोरुन येणाऱ्या वाहनांचा लाईट डोळ्यावर पडला की, दुभाजक दिसतच नाही. व असे अपघात घडतात याच ठिकाणचा हा २० वा अपघात आहे. दुभाजकांवर भडक स्वरुपाचे पेंटिंग करावी. जेणेकरून ते दिसतील व अशा प्रकारे वारंवार होणारे अपघात टाळता येतील. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.